प्रतिनिधी / तासगाव
तासगाव शहरासह तालुक्यात शनिवारी 8 गावात 11 कोरोना बाधित रुग्ण सापडले आहे. तर शहरात 0 रुग्ण असे दिलासादायक चित्र पहावयास मिळाले आहे. तालुक्यात आतापर्यंत 180 दिवसात कोरोना बाधित रुग्णांची संख्या 3118 झाले आहे.तालुक्यातील शनिवारचे रूग्ण असे.
सावळज-2,वज्रचौंडे-3, तसेच वासुंबे, बस्तवडे, विसापूर, शिरगांव वि.,तुरची, व कचरेवाडी, येथे प्रत्येकी एक असे एकूण 8 गावात 11 रूग्ण सापडले आहेत. तालुक्यात गेल्या 26 दिवसापासून यापूर्वी पेक्षा रूग्ण संख्या कमी असेच चित्र पाहवयास मिळत आहे. शहरात तर पाच दिवसात केवळ 1 रूग्ण सापडला आहे.