प्रतिनिधी / मिरज
तालुक्यातील तासगाव रोड काकडवाडी फाटा येथे मोटारसायकल अपघात होऊन उज्वला बाबासाहेब जाधव (वय 56, रा. कवठेएकंद) या महिलेचा मृत्यू झाला. सोमवारी रात्री हा अपघात झाला. याबाबत मिरज ग्रामीण पोलिसात नोंद आहे.
उज्वला जाधव आणि त्यांचे पती हे तासगाव रोडवरून चालले होते. ते काकडवाडी फाटा येथे आले असता त्यांची मोटारसायकल घसरून पडली. या अपघातात उज्वला जाधव या गंभीर जखमी झाल्या. त्यांना उपचारासाठी मिरज शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याबाबत मिरज ग्रामीण पोलिसात नोंद झाली आहे.