वसगडे / वार्ताहर
पलूस तालुक्यातील ब्रम्हनाळ येथील नायकवडी मळा परीसरार गत पाच वर्षापासून वास्तव्यास असणार्या मेंढपाळाच्या मेंढीच्या दहा पिलावर अज्ञात हिंस्त्र पाण्याने हल्ला केल्याने परीसरात खळबळ उडाली आहे. साधारणतः तिन ते चार महिन्याची नऊ पिले मरण पावली आहेत.
कोल्हापुर जिल्हयातील राशीवडेचे रहिवाशी असलेले रंगराव बाबु जोंग यांच्या मेंढ्या असुन ते नेहमी प्रमाणे पिले वस्तिवर सोडुन मेंढ्या चरविण्यासाठी गेले होते. वस्तिवरील महीला धुणे धुण्यासाठी जवळच गेल्या असताना दुपारी १२ च्या सुमारास अज्ञात हिंस्त्र प्राण्याने हल्ला करुन पिलाची लचके तोडले.
महीला वस्तिवर आले नंतर ही घटना निर्दशनास आली. सरंपच उत्तम बंडगर यांनी सदरची घटना वनअधिकाऱ्यांना कळविली. वनखात्याचे रजपुत यांनी घटनास्थळाला भेट दिली असुन पंचनामे करण्याचे काम सुरु आहे. माजी उपसरपंच वैभव मदव्वान्ना यांनी शासनाने योग्य ती मदत करण्याची मागणी केली आहे.