आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला सरकारचा निषेध
प्रतिनिधी / आटपाडी
राज्यातील महाविकास आघाडी सरकारला वीजबिलात सवलत देण्यास भाग पाडण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज आटपाडी तालुक्यातील खरसुंडी येथे महावितरण कार्यालयासमोर वीज बिलांची होळी करण्यात आली.
आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील महाविकास आघाडीचा निषेध करून भरमसाठ आलेल्या वीज बिलांची होळी करण्यात आली. सरकारने तात्काळ वीज बिले माफ करावीत अशी मागणी करत घोषणाबाजी करण्यात आली.
याप्रसंगी विलास काळेबाग, दिपक जाधव, मोहन शिंदे, कैलास शेंडगे, विलास जानकर, शहाजी भिसे, आनंदा चव्हाण, गणेश कटरे, तानाजी कटरे, अनिल मगदूम, रामचंद्र पवार, पप्पू कटरे, ऋषिकेश पुजारी, राहुल गुरव, धोंडीराम इंगवले यांच्यासह लोक उपस्थित होते.