आ. मानसिंगराव नाईक यांनी दिली भेट
वार्ताहर / कोकरूड
शिराळा तालुक्यातील कोकणेवाडीच्या डोंगरास भूस्खलनाचा धोका असल्याने गावातील सर्व ४६ कुटुंबांना स्थलांतरित करून गुढे येथील शाळेत ठेवण्यात आले आहे.
दुर्गम असणाऱ्या पश्चिम भागात झालेल्या जोरदार पर्जन्यवृष्टीमध्ये बऱ्याच ठिकाणी काही प्रमाणावर भूस्खलन झाले आहे. अजूनही धोका टळलेला नसून मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आल्याने, कोकणेवाडीच्या माथ्यावर असणाऱ्या डोंगराचे भुस्खलन होण्याच्या शक्यतेने या गावातील ४६ कुटुंबातील २४६ लोकांना गुढे येथील शाळेत स्थलांतरित करण्यात आले आहे.
आ. मानसिंगराव नाईक यांनी या लोकांना गरजेच्या वस्तू वाटप केल्या आहेत. यावेळी तहसीलदार गणेश शिंदे, गटविकास अधिकारी डॉ.अनिल बागल, सहाय्यक गटविकास अधिकारी आर.एस.माने उपस्थित होते.