प्रतिनिधी / सांगली
आटपाडी-भिंगेवाडी दरम्यान डायनामिक स्कूलजवळ मद्यधुंद ट्रक चालकाने भरधाव वेगात येत चहाची टपरी, ऊसाचा घाना, दोन दुचाकी उडवून एका व्यक्तीला चिरडले.
याविषयी अधिक माहिती अशी कि, आटपाडी-भिंगेवाडी दरम्यान एका मद्यपी ट्रक ड्रायव्हरने भरधाव वेगाने येत चहाची टपरी, ऊसाचा घानासाचा घाना त्याचबरोबर दोन दुचाकींना जोराची धडक दिली. या भीषण अपघातामध्ये एका तरुणाचा जागीच मृत्यु झाला. विक्रमसिंह रवींद्र देशमुख असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. आटपाडी-भिंगेवाडी दरम्यान डायनामिक स्कूलजवळ हा अपघात घडला. अपघातानंतर मद्यधुंद ट्रक चालकाने येथुन पळ काढण्याचा प्रयत्न केला. परंतु जमावाने त्याला पकडले. दरम्यान, हिट अँड रनचा गुन्हा दाखल करण्यासाठी जमावाने आक्रमक पवित्रा घेत ट्रक पोलीस ठाण्यात नेण्यास विरोध केला. यावेळी पोलीस अधिकारी व लोकांमध्ये प्रचंड बाचाबाची आणि वादंग झाल्याने मोठा तणाव निर्माण झाला.