प्रतिनिधी / सांगली
सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महापालिका धनादेशाने वीज बिल भरते. खासगी वीज बिल भरणा केंद्र, महावितरणच्या कर्मचारी यांनी संगनमताने वीज बिलात अपहार केला आहे. जवळपास ३० लाख रुपयांचा हा अपहार आहे. याबाबत सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सखोल तपास होण्याची गरज आहे. दरम्यान या घोटाळ्याची सीआयडी चौकशी करणे गरजेचे आहे, अशी मागणी पालकमंत्री जयंत पाटील यांच्याकडे केली असल्याचे साखळकर यांनी सांगितले.