जादा आकारलेले दोन लाख रुपये रुग्णांच्या नातेवाईकांना परत
प्रतिनिधी / मिरज
कोरोना रुग्णांवरील उपचाराकरिता शासनाने ठरवून दिलेले बिल न घेता जादा बिल आकारणाऱ्या शहरातील चार खासगी हॉस्पिटल महापालिकेने गुरुवारी कारवाईचा दणका दिला. महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांच्या आदेशानुसार अपेक्स, सेवासदन, मेहता आणि संजीवनी या चार हॉस्पिटलनी रुग्णांच्या नातेवाईकांकडून जादा आकारलेली दोन लाखांची रक्कम परत करण्यात आली.
अपेक्स हॉस्पिटलने ५७ हजार ९४० रुपये, सेवासदनने ६४ हजार रुपये, संजीवनी हॉस्पिटलने ६५ हजार रुपये तर मेहता हॉस्पिटलने ९ हजार रुपये रुग्णांच्या नातेवाईकांना परत दिले आहे.
निशुल्क तपासण्यांसाठी प्रयोगशाळा शुल्क आणि निशुल्क औषधांसाठी शुल्क आकारणी केल्याचे चौकशीत निष्पन्न झाले. याबाबत आयुक्त कार्यालयाकडे तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार आयुक्त कापडणीस यांनी उपयुक्त स्मृती पाटील यांना आदेश देऊन सदर रुग्णालयांकडून आकारण्यात आलेल्या बिलांची चौकशी करून तसेच रुग्णालयायांचे म्हणणे ऐकून घेऊन तोडगा काढावा आशा सूचना दिल्या होत्या. त्यानुसार उपयुक्त स्मृती पाटील यांनी संबंधीत रुग्णालयाला नोटिसा बजावून रुग्णांच्या नातेवाईकांना पैसे परत मिळवून दिले.