प्रतिनिधी / मिरज
मिरज-पंढरपूर रस्त्यावर गोरे मळा येथे घराजवळील पत्र्याच्या शेडमध्ये लावलेला महिंद्रा कंपनीचा ट्रॅक्टर अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेला आहे. याबाबत लहू नाना गोरे (वय 48) यांनी मिरज शहर पोलिसात फिर्याद दिली असून, अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, मोबाईल आणि मोटारसायकलींबरोबर चोरटे आता ट्रॅक्टरही चोरुन नेत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
लहू गोरे यांनी रविवारी रात्री 11 वाजता महिंद्रा 575-डी-1 कंपनीचा लाल रंगाचा ट्रॅक्टर (एपी-24-एएक्स-0172) घराजवळील पत्र्याच्या शेडमध्ये लावला होता. रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी सदर ट्रॅक्टर चोरुन नेला. गोरे हे सोमवारी सकाळी घराबाहेर आले असता ट्रक्टर निदर्शनास आला नाही. त्यामुळे अज्ञात चोरट्याने ट्रॅक्टर चोरुन नेला असल्याची फिर्याद गोरे यांनी मिरज शहर पोलिसात दिली आहे. सदरचा ट्रॅक्टरची एक लाख रुपये असल्याचे त्यांनी फिर्यादीत म्हटले आहे.