डोक्यात स्टीलची बदली मारून केले जखमी, दोघांवर गुन्हा
प्रतिनिधी / मिरज
शहरातील गणेश तलाव येथे भेळच्या गाडीवर भेळ खाल्ल्यानंतर पैसे मागितल्याने दोघा तरुणांनी भेळ विक्रेत्याला डोक्यात स्टीलची बादली मारून जखमी केले. याबाबत सागर दादा गीताजे (वय 36 रा. मंगळवार पेठ) यांनी मिरज शहर पोलिसात फिर्याद दिली असून, रोहित राजेंद्र हंडीफोड (रा. माळी गल्ली, मिरज) आणि अभिषेक साळुंखे (रा. मिरज) या दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.
सदरचे दोघेजण या गाडीवर वारंवार भेळ खातात. पण पैसे देत नाहीत. सागर गीताजे यांनी पैशांची मागणी केली. त्यावेळी या दोघांनी मारहाण करून जखमी केले, असे गीताजे यांनी दिलेल्या दिर्यादीत म्हटले आहे.