सराफ पेठा बंद, एचयुआयडीमधील बदलाच्या निषेधार्थ आंदोलन
प्रतिनिधी / मिरज
ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड (बीआयएस) ने हॉलमार्किंग युनिक आयडी (एचयुआयडी) दागिन्यांच्या शुध्दता तपासणी पध्दतीमध्ये केलेल्या बदलाच्या निषेधार्थ राज्यभरातील सुवर्णकारांनी पुकारलेल्या एक दिवसीय लाक्षणिक संप आंदोलनात मिरज शहरातील व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेऊन पाठींबा दर्शविला.
सोमवारी दिवसभर दुकाने बंद ठेवून लाक्षणिक संप पाळण्यात आला. शुध्दता तपासणी पध्दतीमध्ये असंविधानिकरित्या बदल करण्यात आला असून, त्याला सराफ व्यवसायिकांचा विरोध असल्याचे मिरज सराफ सुवर्णकार समितीच्या वतीने सांगण्यात आले