वार्ताहर / सलगरे
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या महिला स्वयंसहायता समूहातील महिलांशी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दुरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला. या कार्यक्रमास मिरज पूर्व भागातील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. आरग-बेडग परिसरातील महिला मोठ्या संख्येने ऑनलाइन कार्यक्रमात सहभागी झाल्या.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘आत्मनिर्भर नारी शक्ती से संवाद’ या कार्यक्रमांतर्गत ग्रामीण भागातील स्वयं सहाय्यता गटातील महिलांशी संवाद साधत महिलांनी स्वकर्तृत्वावर आत्मनिर्भर होण्यासाठी केंद्र शासन विविध योजना राबवित आहे.
सदर कार्यक्रमात महिला बचत गटांना वीस लाखांपर्यंत विनातारण कर्ज उपलब्ध कारण्याची घोषणा मोदी केली आहे. तसेच प्रत्येक महिलेने आत्मनिर्भर बनावे, अशी अपेक्षाही व्यक्त केली.