प्रतिनिधी / मिरज
मिरज शहरातील अक्रम शेख खून प्रकरणातील संशयित आरोपी मोअज्जम उर्फ मोजा शेख (वय २७ रा. मंगळावर पेठ) याने रात्री उशिरा गळफास घेऊन आत्महत्या केली. या आत्महत्येची नोंद मिरज शहर पोलिसात झाली आहे. मोअज्जम उर्फ मोजा शेख हा कोरोना काळात देण्यात आलेल्या पॅरोलच्या सुट्टीवर घरी आला होता.
पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, मोअज्जम शेख हा सुट्टीवर आल्यानंतर पत्नीशीही व्यवस्थितीत बोलत नव्हता. परत मला जेलमध्ये जावे लागणार असल्याचे बोलत होता. मात्र, बुधवारी रात्री त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. मोजा शेख याच्या आत्महत्येचे नेमके कारण समजले नाही. याबाबत मिरज शहर पोलिसात नोंद झाली आहे.