25 तोळे दागिने हस्तगत, मिरज लोह मार्ग पोलिसांकडून 48 तासात गुन्ह्याचा उलगडा
प्रतिनिधी / मिरज
पोलिस असल्याची बतावणी करून रेल्वे प्रवाशाकडून सोन्याचे दागिने लुबाडणाऱ्या दोघा लष्करी जवानांनसह तिघांना मिरज लोहमार्ग पोलिसांनी 48 तासात गजाआड केले. त्यांच्याकडून 25 तोळे सोन्याचे दागिनेही हस्तगत करण्यात आले आहेत. सचिन शंकर चव्हाण (वय 30), राहुल शंकर चव्हाण (वय 25) या दोघा फौजीसह त्यांचा साथीदार शिवाजी नामदेव सूर्यवंशी (वय 25, सर्व रा. फडतरवाडी, ता. अथणी, जि. बेळगाव), अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
मिरज लोहमार्ग पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संभाजी काळे यांनी दिलेली अधिक माहिती अशी, अमृतसर येथून हजरत निजामुद्दीन-यशवंतपूर संपर्क क्रांती एक्स्प्रेसने सोने घेवून आलेल्या ज्योतीराम पाटील (रा.कनवाड ता. शिरोळ) या प्रवाशाला पोलीस आल्याची बतावणी करून सचिन, राहुल आणि शिवाजी या तिघांनी 25 तोळे सोने काढून घेतले होता. सीसीटीव्हीत ही घटना कैद झाली होती. रेल्वे पोलीस फोर्स आणि मिरज लोहमार्ग पोलिसांचे पथकाने आरोपींचा शोध घेऊन दोघा अटक केली. त्यांच्याकडून दागिनेही हस्तगत केले. अटक केलेल्यांमध्ये सचिन आणि राहुल हे दोघे आरोपी सख्खे भाऊ असून, दोघेही लष्करात आहेत.