इतर सर्व दुकाने रात्री 11 पर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी
प्रतिनिधी / सांगली
राज्य शासनाकडील दिलेल्या निर्देशानुसार जिल्हादंडाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी भारतीय साथ रोग नियंत्रण अधिनियम 1897 व आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 अन्वये सांगली जिल्ह्यातील रेस्टॉरंट व सर्व खाद्यगृहे मध्यरात्री 12 वाजेपर्यंत तसेच रेस्टॉरंट, हॉटेल सोडून शासनाने परवानगी दिलेली इतर सर्व दुकाने रात्री 11 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे.
राज्य शासनाकडून तसेच जिल्हा प्रशासकनाकडून कोविड-19 बाबत वेळोवेळी देण्यात आलेल्या निर्देशांचे पालन करणे (उदा. मास्क परिधान करणे, शारिरिक अंतराचे पालन करणे, थर्मल स्क्रिनिंग करणे आणि वारंवार हात धुणे किंवा सॅनिटायझरचा वापर करणे) बंधनकारक राहील, असे आदेश जिल्हादंडाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी जारी केले आहेत.