वार्ताहर / कोकरूड
स्व.सरोजनी शिवाजीराव देशमुख यांच्यावर कोकरूड येथे शोकाकुल वातावरणात अत्यसंस्कार करण्यात आले.चिरंजीव सत्यजित देशमुख यांनी चितेस भडाग्नी दीला. यावेळी मुलगी डॉ. शिल्पा देशमुख, फत्तेसिगराव देशमुख, जिल्हा परिषद सदस्य संपतराव देशमुख, रेणुकादेवी देशमुख, साईतेजस्विनी देशमुख, धैर्यशिल देशमुख उपस्थित होते. यावेळी गावातून अंत्ययात्रा काढण्यात आली.
यावेळी शोक सभेत बोलताना खासदार संजय काका पाटील म्हणाले – स्व. शिवाजीराव देशमुख साहेबाच्या राजकीय वाटचालीत आई साहेबाचा मोठा आधार होता. एक कुटुंब म्हणून त्यांनी कार्यकर्त्यांना सांभाळले होते. त्यांच्या जाण्याने आभाळागत माया करणारी माऊली गमावली आहे. आमदार मानसिगराव नाईक म्हणाले – आई साहेबांनी कार्यकर्त्यांना माया दिली. स्व. देशमुख साहेब यांना राजकीय जीवनात खंबीर साथ दिली. त्याच्या जाण्याने देशमुख कुटूंबा आधार गेला आहे.
माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक म्हणाले – स्व. देशमुख साहेबाच्या अडचणीच्या व चांगल्या काळात ही खंबीरपणे आईसाहेब पाठीशी उभ्या राहिल्या. आम्ही सुरुवातीला साहेबाच्या बरोबर काम करत असताना त्या प्रत्येक व्यक्तीची आपुलकीने चौकशी करत होत्या. त्यांच्या जाण्याने आम्ही सर्वजण पोरके झालो आहोत. यावेळी भाजपा सांगली शहर अध्यक्ष दिपकबाबा शिंदे, आदी सह विविध गावचे सरपंच,उपसरपंच, सदस्य,संस्थाचे पदाधिकारी,ग्रामस्थ,कार्यकर्ते उपस्थित होते.