प्रतिनिधी / शाहुवाडी
कोतोली पैकी सोनारवाडी ता . शाहूवाडी ,येथील दोन संशहित आरोपीनी सांबराची शिंगे चोरून नेल्याप्रकरणी त्यांना शाहूवाडी न्यायालयाने ही चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे .मिळालेल्या माहीती नुसार पाच दिवसा पूर्वी कोतोली येथील जंगलात कुत्र्यांनी एका सांबराचा पाठलाग केला होता त्यात ते सांबर जखमी झाले होते. सदर सांबर जंगलात जखमी अवस्थेत पडले असता भास्कर आनुते, श्रीकांत साळुखें या दोघांनीही जखमी सांबराची शिंगे कुऱ्हाडीने तोडुन आपल्या घरात लपवून ठेवली. ही घटना वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी नंदकुमार नलवडे यांना समजताच त्यांनी जंगलातील घटनास्थळाला भेट दिली तेंव्हा हा प्रकार त्यांच्या निदर्शनात आला.
त्यांनी वनकर्मचाऱ्यामार्फत चोरट्यांचा शोध घेवून त्यांना अटक करून शाहूवाडी न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांना दि २० एप्रिल पर्यत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश देण्यात आला . दरम्यान जंगल परीसरात सतत शिकारीचां वावर असल्याची चर्चा नागरिकांत सुरू होती. सदर घटनास्थळास जिल्हा सहायक वनसंरक्षक सुनिल निकम यांनी भेट दिली तरआरोपी पकडण्याकामी वनपरिक्षेत्र अधिकारी नंदकुमार नलवडे , वनपाल संजय कांबळे , वनरक्षक दिग्वीजय पाटील , जालीदंर कांबळे , राजाराम राजीगरे , बी पी लोखंडे , कुसुम कांबळे, बाजीराव माईगंडे आदी सह वनकर्मचाऱ्यांचा समावेश होता .