वृत्तसंस्था/ ग्वाल्हेर
येथे सुरू असलेल्या हॉकी इंडियाच्या दुसऱया कनिष्ठ महिला अकादमी राष्ट्रीय हॉकी स्पर्धेत अ गटातील झालेल्या सामन्यात साई अकादमीने भाई बेहलो हॉकी अकादमी भगत संघाचा 11-0 अशा गोलफरकाने दणदणीत पराभव केला.
या सामन्यात साई अकादमीतर्फे संजना होरोने 3 गोल, सुस्मिता पन्ना आणि दीपाली यांनी प्रत्येकी दोन गोल, सुजाता कुजूर, पुजा साहु, प्रिनी कंदीर, एस.टोप्पो यांनी प्रत्येकी एक गोल केला. या स्पर्धेतील ब गटातील एका सामन्यात मध्यप्रदेश हॉकी अकादमीने जय भारत हॉकी अकादमीचा 6-0 असा पराभव केला.