वार्ताहर/ वेळवी
दापोली तालुक्यातील साकुर्डे-जोशीवाडीतील रघुनाथ धोंडू जोशी (58) यांनी 23 जुलै रोजी रात्री आजारपणाला कंटाळून आपल्या राहत्या घरी आत्महत्या केली. तसे त्यांनी चिठ्ठीत लिहून ठेवले होते.
याची खबर प्रभारी सरपंच सचिन बैकर यांनी पोलीस पाटील श्रीकांत बैकर यांना दिली व पोलीस पाटलांनी दापोली पोलीस स्थानकास कळवले. ही घटना 23 जुलै रोजी रात्री घडली असली तरी ती 24 रोजी सायंकाळी 4च्या दरम्यान गावातील लोकांना समजली. घटनास्थळाचा पंचनामा पोलीस उपनिरीक्षक वाघ व कांबळे यांनी केला. अधिक तपास बीट अंमलदार झगडे करीत आहेत. त्यांच्या पश्चात 2 भाऊ व दोन विवाहित मुली आहेत.