वार्ताहर/ ताम्हाणे
संगमेश्वर तालुक्यातील साखरपा बाजारपेठेत लॉकडाऊनला नागरिकांकडून हरताळ फासला जात आहे. परिसरातील नागरिक बाजारपेठेत मोठय़ा प्रामणात खरेदी करण्यासाठी जमत असल्याचे दिसून येत आहे. रविवारी चिकन सेंटरवर चिकन खरेदी करण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. यावेळी ‘सोशल डिस्टन्सिग’ला हरताळ फासण्यात आला होता. बाजारपेठेत मोठय़ा प्रमाणात दुचाकीस्वार फिरताना दिसून येत होते. बाजारपेठेत वावरणारे नागरिक मास्क न बांधताच फिरत होते. यामध्ये ज्येष्ठ नागरिकही मोठय़ा प्रमाणात दिसत होते.