सांखळी /प्रतिनिधी
साखळी पालिका क्षेत्रातील प्रभाग नऊ मधील पोटनिवडणुकीत भाजप पुरस्कृत उमेदवार दशरथ आजगावकर याना विजयी करण्यासाठी भारतीय जनता पक्षाने विशेष लक्ष दिले असून मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रभागात अनेक कल्याण कारी योजना सुरू असून या वेळेला भाजप चा विजय निश्चित असल्याची माहिती नगराध्यक्ष यशवंत माडकर ,मंडळ अध्यक्ष गोपाळ सुर्ल कर ,आनंद काणेकर शुभदा सावईकर
,राष्मी देसाई,नारायण बोर्ये कर ,ब्रम्हा देसाई कालिदास गावस, आदींनी पत्रकार परिषदेत दिली
साखळी भाजप कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत उमेदवार दशरथ आजगावकर हे सक्षम उमेदवार असून मुझवरवा डा, दत्तवाडी,वरची हाळी, आदी परिसरातील 584मते असून भाजपला उत्तम प्रतिसाद मिळत असल्या चे गोपाळ सुर्लकर यांनी सांगितले
मुख्यमंत्री डॉ सावंत यांनी अनेक योजना साखळी साठी आखलेल्या असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रा भागात अनेक कामे झाली आहेत सुरू आहेत जनतेचा पाठींबा उत्तम असून आपला विजय निश्चित असल्याची खात्री उमेदवार दशरथ आजगावकर यांनी व्यक्त केली
परिवर्तन नक्की होणार असून जनतेला विश्वासात घेऊन प्रभाग तसेच पालिका विभागात योजनांची पूर्तता करणार असल्याचे माडकर यांनी सांगितले