प्रतिनिधी / सातारा
सातारच्या अभिजित बिचुकले या चोकोबा शिवाय मुख्यमंत्र्यांची पूजा यशस्वी नाही म्हणत पंढरपुराकडे निघालेल्या बिग बॉस फेम अभिजित बिचुकले यांची पंढरपूर वारी पोलिसांनी पंढरपूर आधीच रोखली.
काल दुपारी सातारा येथून मी पंढरपुरला जाणारच कोण अडवते बघू, म्हणत वारकऱ्यांच्या वेशात अभिजित बिचुकले हे पंढरपूरचा दिशेने रवाना झाले तदपूर्वी त्यांनी ह भ प बंडा तात्या कराडकर यांची ही भेट घेऊन मी पंढरपूरला जाणारच असे स्पष्ट केले होते. हे सरकार सामान्य गरीब, धार्मिक जनतेचा विरोधात करत असून सरकारला दारुड्यांचा पुळका आहे. म्हणून त्यांनी दारूची दुकाने उघडी ठेवली आणि पंढरपूरला लॉक केले परंतु मी होणत्याही परिस्थितीमध्ये विठ्ठलाचे पंढरपुरात दर्शन घेणार म्हणजे घेणार असे प्रसिद्धी माध्यमांवर बोलून दाखवले होते.
या सातारच्या चोकोबाची वारी पंढरपूरच्या दिशेने रवाना झाली. मात्र याची पोलिसांना अजिबात खबर न्हवती. जेव्हा साताऱ्यातून बिचुकले निघाले ही बातमी प्रसिद्ध झाली. तेव्हा पोलीस जागे झाले आणि चक्रे फिरू लागली. तो पर्यंत बिचुकल्यांची वारी पंढरपूर नजीक पोहचली होती. उपरी या गावी पोहचताच पोलिसांनी बिचुकले यांची वारी रोखली आणि त्यांना पुढे जाण्यासाठी परवानगी नाकारली. तेव्हा अभिजित रावांनी तासभर बरीच फोना फोनी केली. मात्र सर्व मेहनत निष्फल झाल्याने पोलिसांनी बिचुकल्यांची वारी फिरवून सोबत एक पोलीस देत पुन्हा साताऱ्याचा दिशेने रवाना केली.