प्रतिनिधी / सातारा
शहराच्या उपनगरात सतत बिबट्याचे दर्शन घडते. मंगळवारी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास गोडोली येथील गोळीबार मैदान साई पायरी पार्क येथे मनोज कुंभार यांच्या श्वानावर बिबट्याने हल्ला करून जखमी केले. मात्र त्यांनी वेळीच बिबट्याच्या तावडीतून सुटका केली. त्यामुळे नागरिक भयभीत झाले असून सचिन वायदंडे यांनी वनविभागाला पत्र लिहले आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की गोडोली परिसरातील साई पायरी पार्क येथे रात्री भटके श्वान जोरजोरात रात्री भूकंत होते. त्यामुळे सचिन वायदंडे यांची झोपमोड झाली. ते हातात काठी घेऊन त्या श्वानाना हाकलून देण्यासाठी बाहेर आले. त्यानंतर पंधरा मिनिटात त्यांच्या लगतच्या प्लॉटमध्ये मनोज कुंभार यांच्या पाळीव श्वानावर बिबट्याने झडप मारून पकडले होते. कुभांर यांनी लगेच बिबट्याने त्यांच्या श्वानावर हल्ला केल्याचे पाहून त्यांनी काठी आपटत आरडाओरडा करताच बिबट्या पळून गेला. आणि त्या श्वानाचे प्राण वाचले. वायदंडे यांनी बिबट्याच्या बाबत वनविभागाच्या पत्र लिहून कळवले आहे.