सातारा/ प्रतिनिधी
सातारा जिल्ह्यातील विविध कोरोना केअर सेंटर, उपजिल्हा रुग्णालय येथे अनुमानित म्हणून भरती असलेल्या 52 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अमोद गडीकर यांनी दिली.
जिल्हयात आज बुधवारी सकाळी 52 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून दोन बाधित व्यक्तींचा मृत्यु झाला आहे. त्यामुळे सातारा जिल्हा हादरला आहे. जिल्ह्यात 12 तासात 58 रुग्ण वाढल्यामुळे जिल्हयाची चिंता वाढली असून कोरोना बाधित रुग्णांची संख्या 394 झाली आहे.
वाई तालुक्यातील आसले येथील 67 वर्षीय व्यक्ती आणि पाटण तालुक्यातील जांभेकरवाडी येथील 70 वर्षीय व्यक्तीचा कोरोना संसर्गाने मृत्यु झाला आहे. जिल्हयात आता पर्यंत 11 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यु झालाय. जिल्हयात सद्यस्थितीला 257 कोरोना बाधित रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर जिल्हयात आता पर्यंत 126 जण कोरोना मुक्त मुक्त झाले आहेत.
तालुकानिहाय कोरोना बाधित
माण तालुका- म्हसवड-1, तोंडले-1, भालवडी-1 व लोधवडे-2
सातारा तालुका- जिमनवाडी 2, खडगाव-1, कुस बुद्रुक 1
वाई तालुका- आकोशी-1, आसले-1, मालदपूर 1, देगाव-1 सिद्धनाथवाडी-1 व धयाट-1
पाटण तालुका -धामणी-4, गलमेवाडी 1, मन्याचीवाडी 1, मोरगिरी 2, आडदेव 1, नवारस्ता 1, सदुवरपेवाडी 2,
जांभेकरवाडी 1 (मृत्यु)
खंडाळा तालुका- अंधोरी 2, घाटदरे 1 व पारगाव 7
जावळी – सावरी 3, केळघर 2
महाबळेश्वर तालुका- कासरुड 2, देवळी 3 गोळेवाडी 1
कराड तालुका- खराडे 2, म्हासोली 1
फलटण तालुका सस्तेवाडी 1
खटाव तालुका- वांझोळी 1 वरची अंभेरी 1