सातारा / प्रतिनिधी
कोरोना अखेर जिल्हा परिषदेत एण्ट्री केलेली आहे. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले यांना कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न होताच त्यांनी उपचारासाठी कराड येथील चॅरिटेबल हॉस्पिटलमध्ये रात्रीच दाखल झाले.जिल्हा परिषदेचा अर्थ विभागातील लिपिक पाटण शहरातून अपडाऊन करत होते. त्यांना बाधा झाल्याचे समजताच रात्रीच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत यांनी दोन दिवस जिल्हा परिषदेचे कामकाज बंद ठेवण्याचा आदेश दिला गेला आहे. अर्थ विभागाचे जे कर्मचारी संपर्कात आले होते त्यांचे स्वाब घेण्यात आले. मात्र, त्या लिपिकाच्या अनेकजण संपर्कात आल्याची जोरदार चर्चा सुरू होती.अनेकांनी स्वतःच होम कोरोनटाइन होण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्हा परिषदेच्या इमारतीला सॅनिटायझर करण्यात येत होते.
सातारा जिल्हा परिषदेच्या विविध विभागात सुमारे आठ हजार कर्मचारी काम करतात. दोन्ही इमारतीत काम करणारे कर्मचारी, अधिकारी हे बाहेरगावाहून येत असतात. काही कर्मचारी तर चक्क हातावर होम कोरोन टाइनचे शिक्के मुजवून कामावर येत होते, तर काहींच्या घराशेजारी रुग्ण आढळून आले तरी ते जिल्हा परिषदेत दिसत होते.
त्याबद्दल तरुण भारतने वारंवार आवाज उठवला होता. मात्र, कायदा नियम हे सर्वसामान्य नागरिकांना जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना वरदान आहे , अशाच अविर्भावात कामकाज सुरू होते.पाटण शहरातून येणारा अर्थ विभागातील लिपिक हा बहुतांशी अनेकांच्या संपर्कात दररोज येत होता.त्याच्याकडे महत्वाचे टेबल आहे. अगदी जिल्हा परिषदेच्या प्रत्येक विभागाच्या महत्वाच्या फायली त्यांच्या हाताखालुन जायच्या.त्यांना कुठे कोरोनाची लागण झाली हे समजू शकले नाही परंतु जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत यांनी रात्री आदेश दिला आहे.त्यांच्या आदेशानुसार जिल्हा परिषदेला दोन दिवस सुटी जाहीर करण्यात आली. जिल्हा परिषदेच्या मुख्य इमारती सानिटायझर करण्यात येत होते.
जिल्हा परिषद अध्यक्ष उदय कबुले यांना कोरोनाची बाधा
जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले यांच्या घरात गेल्या चार दिवसांपूर्वी कोरोनाची एण्ट्री झाली होती.त्यांच्या दोन्ही मुलांपैकी एकाला सुरुवातीला लक्षणे जाणवली. त्यामुळे त्यांनी त्यावेळी तपासणी केली होती.तेव्हा निगेटिव्ह आले होते.दुसऱ्या मुलाच्या तपासणीवेळी स्वाब दिला होता तेव्हा ही निगेटिव्ह आले होते.पुन्हा त्यांना खोकला जाणवू लागल्याने जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.आमोद गडीकर यांच्या विनंतीवरून स्वाब तपासणी केली.त्याचा रिपोर्ट रात्री आला.ते रात्रीच उपचारासाठी कराड येथील कृष्णा हॉस्पिटलमध्ये दाखल झाले आहेत.