सातारा /प्रतिनिधी
जिल्ह्यात काल सोमवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्ट नुसार १७४ जणांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत. तसेच ८ बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
८ जणांचा उपचारा दरम्यान मृत्यू
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथे काले ता. कराड येथील 30 वर्षीय महिला, पाटण येथील 54 वर्षीय पुरुष, चोरे ता. कराड येथील 57 वर्षीय महिला, शनिवार पेठ सातारा येथील 73 वर्षीय पुरुष, सोनापूर ता. सातारा येथील 92 वर्षीय महिला, सोमवार पेठ फलटण येथील 56 वर्षीय पुरुष व फलटण येथील 70 वर्षीय महिला या सात कोरोना बाधितांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. तर सातारा येथील खाजगी हॉस्पिटल येथे शनिवार पेठ कराड येथील 68 वर्षीय कोरोना बाधित महिलेचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे, असे एकूण 8 कोरोना बाधितांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला असल्याचेही डॉ. गडीकर यांनी कळविले आहे.