प्रतिनिधी/ सातारा
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्हाधिकारी यांना दिलेल्या आदेशानुसार सातारा पालिकेचे मुख्याधिकारी अभिजीत बापट यांच्या सुचनेनुसार सातारा पालिकेच्या पथकाने काल रात्री शहरात वेळेपेक्षा रात्री उशीरापर्यंत दुकाने सुरु ठेवल्याचे आढळून आल्याने त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली. त्या दुकानांकडून पथकाने दंड वसूल केला आहे. सातारा पालिकेचे पथक फिरते आहे.
याबाबत पालिकेकडून मिळालेली माहिती अशी की, सातारा पालिकेचे मुख्याधिकारी अभिजीत बापट यांनी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या आदेशानुसार पथकास सुचना दिल्या आहेत. त्यानुसार पालिकेच्या पथकाने काल रात्री उशीरा शहरात तपासणी केली असता काही दुकाने ठरवून दिलेल्या वेळेपेक्षा उशीरापर्यंत सुरु असल्याचे निदर्शनास आले. त्यावरुन त्या दुकान मालकांवर दंडाची कारवाई करण्यात आली. त्यामध्ये पोवई नाक्यावरील मरिआई कॉम्पलेक्स येथील मॉझिनिअस बेकरीचे अमर जाधव, न्यू पुणा बेकरीचे मिथून शिंदे, महेंद्र फैंजणी या तिघांच्यावर प्रत्येकी एक हजार रुपयांप्रमाणे दंड वसुल करण्यात आला.