प्रतिनिधी / सातारा
येथील राजज्ञ चौक मंगळवार पेठ येथे धनंजय अनंत कुलकर्णी (वय- 52 वर्षे रा 325 यादोगोपाळपेठ सातारा) या मटका एजंटास शाहूपुरी पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्यासह आणखी एकावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, सहाय्यक पोलीस निरीक्षक वायकर यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की राजज्ञ चौकात मटका सुरू आहे. त्यावरून दि. 27 रोजी हवालदार माने, कुभांर यादव यांनी तेथे पावणे दोन च्या सुमारास छापा टाकला.तेथे मटका चालवणारा धनंजय कुलकर्णी याच्याकडून मटक्याचे साहित्य व रोख 615 रुपये हस्तगत केले.त्यास ताब्यात घेतले असता त्याने यासीन इक्बाल शेख रा. 426 शनिवारपेठ सातारा याचा मटका असून त्याच्याकडे 350 रुपये हजेरीवर मटका ऐजंट म्हणून कामास असल्याचे सांगितले. यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास शाहूपुरी पोलीस करत आहेत.