प्रतिनिधी/ सातारा
सातारा शहर हे छत्रपती शाहू महाराजांनी वसवले गेलेले शहर आहे.या शहरात आजही जुन्या वास्तू त्या काळचे दाखले देतात.ब्रिटीश काळात काही छायाचित्रे काढण्यात आली होती.ती या लॉक डाऊनमध्ये सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहेत.विशेष म्हणजे त्यात किल्ले अजिंक्यतारा, संगम माहुलीच्या फोटोंचा समावेश आहे.
लॉक डाऊन काळात अनेक रहस्य उलगडत आहेत.त्यामध्ये सातारा शहरातील जुन्या फोटोंचा समावेश आहे.हे फोटो ब्रिटिश लायब्ररीतले आहेत.मग त्यामध्ये 1853चा सातारा, 1830 ला काढलेले किल्ले अजिंक्यतायाची पाठीमागुनचा बाजू, संगम माहुली, जलमंदिर पॅलेस, राजवाडा, 1833चा किल्ले अजिंक्यतारा, 1880 साली काढलेले संगम माहुलीचे छायाचित्रे सोशल मीडियावर चांगलेच गाजत आहेत.ही दुर्मिळ छायाचित्रे ब्रिटिश लायब्ररीतली आहेत असे सांगितले जाते.