बेळगाव : कोरोनाच्या दोन वर्षांच्या संकटानंतर यंदा गणेशोत्सव उत्साहात साजरा होणार आहे. दोन वर्षाच्या खंडानंतर आता गणेशोत्सव सार्वजनिकरित्या साजरा करता येण्याचा अमाप उत्साह पहायला मिळत आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ कार्यकर्त्यांची लगबग सुरू आहे. मंडप उभारणीच्या काम अंतिम टप्प्यात आले असून यावेळी आकर्षक देखावे करण्यावर भर देण्यात येणार आहे. त्यांची जोरदार तयारी गणेशोत्सव मंडळांचे कार्यकर्ते करीत आहेत. तसेच घरोघरी बाप्पांच्या स्वागताची तयारी जोरदार सुरु असून आकर्षक सजावट, देखावे करण्यासाठी प्रत्येकजण झटत आहेत.
Previous Article24 दिवसांपासून बिबटय़ा रेसकोर्सवरच
Next Article गणेशोत्सव खरेदीसाठी बाजारपेठ फुलली!
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.