साटेली भेडशी / प्रतिनिधी:
सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळ भेडशी नूतन अध्यक्षपदी सिद्धेश उर्फ सनी केसरकर तर उपाध्यक्षपदी मिथुन बेळेकर यांची एकमताने निवड करण्यात आली. मंगळवारी दामोदर मंदिर येथे याबाबतची बैठक पार पडली या बैठकीला गावातील बहुसंख्य युवक उपस्थित होते. यावेळी सन २०२१ सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळ भेडशी नूतन अध्यक्षपदी सिद्धेश उर्फ सनी केसरकर तर उपाध्यक्षपदी मिथुन बेळेकर यांची एकमताने निवड करण्यात आली.तसेच उर्वरित कार्यकारिणी निवडण्यात आली.मावळते अध्यक्ष मनोज गोलम यांचे नूतन अध्यक्ष सिद्धेश केसरकर यांनी आभार मानले तर नूतन अध्यक्ष श्री.केसरकर ,उपाध्यक्ष श्री.बेळेकर आणि कार्यकारिणी यांचे उपस्थितांनी अभिनंदन केले.