वार्ताहर / सावंतवाडी
गेल्यावर्षी ऑगस्टमध्ये मोठा दिमाखात शाही थाटात तीस कोटी रुपये खर्चाच्या अद्यावत मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल चे भूमिपूजन करण्यात आले. सावंतवाडी शहरात उपजिल्हा रुग्णालयाच्या परिसरातच हे अध्यावत दुमजली हॉस्पिटल साकारणार होते. पण आता बारा महिने उलटून गेले तरी हॉस्पिटलच्या इमारती ची एक वीट ही लागली नाही. जागेचा मुद्दा सध्या ऐरणीवर असून नियोजित जागेचा प्रश्न जैसे थेच आहे दोन एकर जागा या हॉस्पिटल साठी लागणार असून सावंतवाडी पासून काही अंतरावर असलेल्या वे ते गावात पालकमंत्री उदय सामंत व खासदार विनायक राऊत यांनी गेल्या एप्रिल महिन्यात जागा पाहिली या जागेवरून राजकीय वाद सुरू झाले .शहराबाहेर हॉस्पिटल हलवू नये अशी भूमिका घेण्यात आली. त्यामुळे या हॉस्पिटलचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. वर्ष संपले तरी हॉस्पिटल या जागेचा प्रश्न भिजत घोंगडे आहे. सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येऊन प्रश्न निकाली काढणे आवश्यक आहे.