प्रतिनिधी / सावंतवाडी:
सावंतवाडी कारागृहात कोरोनाने शिरकाव केला आहे. तीन कैद्यांना कोरोनाची लागण झाली आहे. शनिवारी ही बाब स्पष्ट झाली आहे. त्यांना उपचारासाठी ओरोस जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. कारागृहात सध्या 54 कैदी असून त्यांची तपासणी करण्यात येणार आहे. तर अधिकारी आणि कर्मचाऱयांची तपासणी करण्यात आली असून त्यांचे अहवाल निगेटिव्ह आल्याचे कारागृहातून सांगण्यात आले होते. यापूर्वी कारागृहात हेड कॉन्स्टेबलला कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे कोरोनाचा फैलाव झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली.
कारागृहात कोरोनाचा फैलाव होऊ नये, यासाठी पुरेशी खबरदारी घेण्यात आली होती. परंतु कोरोनाने अखेर शिरकाव केला. त्यामुळे कारागृह प्रशासन हादरले आहे. कैद्यांची तपासणी करण्यात येणार आहे. सावंतवाडी शहरात खासकीलवाडा, सबनीसवाडा, माठेवाडय़ातही कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत. तर सांगेली आरोग्य केंद्रांतर्गत एक, निरवडे प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत तीन आणि बांदा येथे एक रुग्ण सापडला. तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या 269 तर शहरात 115 झाली आहे.