ओटवणे/ प्रतिनिधी-
सावंतवाडी पाटबंधारे उपविभागाचे उप अभियंता संतोष कविटकर यांची चिपळूण येथे पाटबंधारे उपविभाग चिपळूण येथे उप अभियंता म्हणून बदली झालेली आहे. चिपळूण पाटबंधारे उपविभाग उपअभियंता पद रिक्त होते. संतोष कविटकर यांच्या विनंतीनुसार त्यांची या जागी बदलीने नियुक्ती करण्यात आलेली आहे. जलसंपदा विभागातील अनेक अधिकारी व कर्मचारी यांच्या त्यांच्या विनंतीनुसार राज्यात बदल्या करण्यात आलेल्या आहेत. जलसंपदा विभागाचे अवर सचिव अरविंद पगार यांनी बदल्यांचे आदेश काढलेले आहेत.