सांगली/प्रतिनिधी
ज्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी मोठे योगदान दिले आहे अशा स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या बद्दल आक्षेपार्ह मजकूर छापून त्यांची बदनामी करणाऱ्या काँग्रेस पक्षाच्या विरोधात भारतीय जनता पक्षातर्फे राममंदिर चौकात निषेधाच्या जोरदार घोषणा देत निदर्शने करण्यात आली.
काँग्रेस सेवादलाने स्वातंत्र्यवीर सावरकरांच्याबद्दल आक्षेपार्ह मजकूर छापून त्यांची बदनामी केली असून काँग्रेसला हे न शोभणारे आहे. याविरोधात भारतीय जनता पक्ष आणि सावरकरप्रेमीनी संपूर्ण देशात निदर्शने केली. सावरकर हे सर्वांसाठी अत्यंत आदरणीय व्यक्ती आहेत. त्यांच्याबद्दल आक्षेपार्ह उद्गार काढून संबंधितांनी स्वतःची हीन प्रवृत्ती दाखवून दिली आहे. याबद्दल त्यांच्यावर देशद्रोहाचा खटला दाखल करण्यात यावा अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
यावेळी आमदार सुधीरदादा गाडगीळ, प्रदेश उपाध्यक्ष शेखर इनामदार, महापौर संगीता खोत, नगरसेवक संजय, विनायक सिंहासने, बाळासाहेब देशपांडे, बंडू सरगर,राजेंद्र कुंभार,बर्वेमामा,दिपक माने सचिन बालनाईक, सोनाली सागरे, गीतांजली ढोपे–पाटील यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.