नवी दिल्ली : ग्वाल्हेरच्या राजमाता विजया राजे सिंधिया यांच्या सन्मानार्थ काढण्यात आलेले 100 रुपयांचे नाणे सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जारी केले. व्हर्च्युअल प्रोग्रामच्या माध्यमातून सिंधिया कुटुंबीयांच्या उपस्थितीत या नाण्याचे अनावरण करण्यात आले. विजया राजे सिंधिया यांच्या जन्मशताब्दीनिमित्त हे नाणे जारी करण्यात आले आहे. अर्थ मंत्रालयाने जारी केलेल्या या 100 रुपयांच्या नाण्याच्या दोन्ही बाजूंची खास रचना करण्यात आली आहे. या नाण्याच्या एका बाजूला राजमाता विजया राजे सिंधिया यांचे चित्र आहे. त्याच बाजूला ‘श्रीमती विजया राजे सिंधिया यांची जन्मशताब्दी’ असा उल्लेख करण्यात आला आहे.
Trending
- टक्का वाढला : 74.92 टक्के मतदान
- चिकोडी लोकसभेसाठी 78.63 टक्के मतदान
- बेळगाव लोकसभा मतदारसंघात 71.49 टक्के उत्स्फूर्त मतदान
- बेळगाव दक्षिण मतदारसंघात चुरशीने मतदान
- संवेदनशील मतदारसंघात शिस्तबद्ध मतदान
- गोकाक, अरभावीत उत्स्फूर्तपणे मतदान
- Sangli : जिल्ह्यात सरासरी ६० टक्के मतदान; सांगलीत चुरशीने मतदानानंतर; निकालाकडे लक्ष
- कारवार लोकसभा मतदारसंघात शांततेत मतदान