रुग्णांची संख्या 56 वर, रविवारी तीनने वाढ
पॉझिटिव्ह रुग्ण
रानबांबुळी-1, हिवाळे-3, नाटळ -1, कासार्डे1, नाद-1, जानवली-1
प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:
सिंधुदुर्गात ‘कोरोना’बाधित रुग्णांची संख्या आता वेगाने वाढू लागली असून अर्धशतक पार करत 56 वर पोहोचली आहे. ‘कोरोना’ने थेट जिल्हा रुग्णालयात प्रवेश केला असून शनिवारी रात्री उशिरा प्राप्त झालेल्या पाच पॉझिटिव्ह अहवालात एका स्टाफ नर्सचा समावेश आहे. त्यामुळे डॉक्टर्स, नर्स आणि कर्मचाऱयांनाही धोका निर्माण झाला आहे.
जिल्हय़ात शनिवारी रात्री आणखी पाच तर रविवारी तीन रुग्ण आढळले. त्यामुळे जिल्हय़ात ‘कोरोना’बाधित रुग्णांची संख्या 56 वर गेली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी यांनी दिली. एकूण 56 रुग्णांमधील सात रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. एकाचा मृत्यू तर एक रुग्ण मुंबईला उपचारासाठी गेला. त्यामुळे जिल्हा रुग्णालयाच्या आयसोलेशन वॉर्डमध्ये सध्या 47 रुग्ण औषधोपचाराखाली आहेत.
शुक्रवारी 29 मेपर्यंत जिल्हय़ात 48 ‘कोरोना’बाधित रुग्ण सापडले होते. त्यानंतर शनिवारी रात्री उशिरा प्राप्त झालेल्या 31 अहवालातील 26 निगेटिव्ह तर 5 पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामध्ये मालवण तालुक्यातील हेदूळ गावची व सध्या रानबांबुळी येथे राहणाऱया स्टाफ नर्सचा समावेश आहे. जिल्हा रुग्णालयातील आयसोलेशन वॉर्डमध्ये ती सेवा बजावत होती. त्यामुळे जिल्हा रुग्णालयात ‘कोरोना’ने प्रवेश केल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच जिल्हा रुग्णालयामध्ये काम करणारे डॉक्टर्स, नर्स व अन्य कर्मचाऱयांना संसर्गाचा धोका निर्माण झाला आहे. तसेच अन्य चार पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये मालवण तालुक्यातील हिवाळे येथील 37 वर्षीय एक आणि 31 वर्षीय एक अशा दोन तरुणांचा समावेश आहे. तर कणकवली तालुक्यातील नाटळ येथील 27 वर्षीय एक तरुणी आणि कासार्डे येथील 26 वर्षीय एक तरुणी यांचा समावेश आहे.
जिह्यात रविवारी आणखी तीन पॉझिटिव्ह
जिल्हा सामान्य रुग्णालयाला रविवारी प्राप्त झालेल्या 123 कोरोना तपासणी अहवालापैकी तीन अहवाल पॉझिटिव्ह तर 120 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. पॉझिटिव्ह आलेल्या तीन रुग्णांमध्ये देवगड तालुक्यातील नाद येथील 58 वर्षीय पुरुष, कणकवली तालुक्यातील जानवली येथील 53 वर्षीय पुरुष आणि मालवण तालुक्यातील हिवाळे येथील 32 वर्षीय तरुण यांचा समावेश आहे.
असे आहेत ‘कंटेंटमेंट झोन’
जिल्हय़ात सध्या कणकवली तालुक्मयातील शिवडाव, डामरे, मौजे वारगाव येथील धुमकवाडी, मौजे हरकुळ बुद्रुक येथील कांबळेवाडी, आईनतळवाडी, व्हावटवाडी, मौजे बीडवाडी येथील बीडवाडी हायस्कूल व आवार, मौजे कासार्डे येथील धुमाळवाडी, मौजे हरकुळ खुर्द येथील गावठण, तांबळवाडी, वरचीवाडी, गायकवाडवाडी, मौजे बावशी येथील शेळीचीवाडी, मौजे पियाळी येथील गावठण, वैभववाडी तालुक्मयातील मौजे तिरवडे तर्फ सौंदळ गावातील घागरेवाडी, मौजे कोळपे व मेहबूबनगर, ब्राह्मणदेववाडी आणि उंबर्डे, सावंतवाडी तालुक्मयातील कारिवडे, मौजे माडखोल येथील बामणादेवीवाडी, कुडाळ तालुक्मयातील पणदूर-मयेकरवाडी, मालवण तालुक्मयातील हिवाळे, सुकळवाड येथील राऊळवाडी व ठाकरवाडी असे कंटेनमेंट झोन आहेत.
236 अहवालांची प्रतीक्षा
जिह्यात एकूण 27 हजार 507 व्यक्ती संस्थात्मक विलगीकरणात असून त्या पैकी 428 व्यक्ती शासकीय संस्थात्मक विलगीकरण कक्षात आहेत. तर 25 हजार 895 व्यक्तींना गावपातळीवरील संस्थात्मक विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. नागरी क्षेत्रात 1 हजार 184 व्यक्ती संस्थात्मक विलगीकरणात आहेत. तर जिह्यात प्रवेश केलेल्या इतर सर्व नागरिकांना गृह विलगीकरणात ठेवण्यात आले आहे.
1 हजार 810 अहवाल प्राप्त
जिल्हा रुग्णालयामार्फत एकूण 1 हजार 810 नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असून त्यापैकी 1 हजार 574 तपासणी अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यातील 56 पॉझिटिव्ह आले असून उर्वरित 1 हजार 518 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. आणखी 236 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झालेला नाही. जिल्हा सामान्य रुग्णालयातील विलगीकरण कक्षात सध्या 164 रुग्ण दाखल आहेत. त्यापैकी 84 डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलमध्ये, 42 रुग्ण डेडिकेटेड कोविड हेल्थ केअर सेंटरमध्ये तर कोविड केअर सेंटरमध्ये 38 रुग्ण दाखल आहेत. आरोग्य यंत्रणेमार्फत रविवारी 6 हजार 16 व्यक्तींची तपासणी करण्यात आली.
जिह्याबाहेरून येणाऱयांची संख्या 58 हजार 825 वर
मुंबई, पुणेसह इतर जिह्यातून येणाऱया लोकांचा ओघ अजून थांबलेला नाही. रोजच्या रोज दोन-तीन हजार लोक येतच आहेत. परराज्यातून व महाराष्ट्र राज्याच्या अन्य जिह्यातून सिंधुदुर्गात 2 मेपासून आजअखेर एकूण 58 हजार 825 व्यक्ती दाखल झाल्या आहेत.