दैवज्ञ महिला मंडळ अध्यक्ष मोहिनी मडगांवकर यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी
सावंतवाडी / प्रतिनिधी-
“अत्यावश्यक दुकानात जशी गर्दी होते तशी सुवर्ण कारागिरांच्या दुकानात गर्दी होत नाही. मागील अडीच महिन्यांपासून जिल्ह्यातील सुवर्णकारांची दुकाने बंद आहेत. मजुरीवर काम करणारे जे सोनार आहेत त्यांची फार वाईट अवस्था आहे. त्यांना उदरनिर्वाह करण्याचे दुसरे काहीही साधन उपलब्ध नसल्याने त्याच्यावर उपासमारीची पाळी आलेली आहे, त्यामुळे आमची दुकाने सुरू करायला परवानगी द्या. आम्ही सर्व नियम व काळजी घेऊन काम करू,” अशी मागणी दैवज्ञ महिला मंडळ अध्यक्ष मोहिनी मडगावकर यांनी जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी यांच्याकडे केली आहे.