प्रतिनिधी / इचलकरंजी
सीआयडी पोलिस असल्याची बतावणी करत दोन जणांनी वृद्धाला लाखोंचा गंडा घातला. वृध्दाकडील १४ तोळ्यांचे सोन्याचे दागिने असा ५ लाख ६० हजार रुपये किंमतीचा ऐवज दोघांनी लंपास केले.
छत्रपती संभाजी चौक परिसरातील किरण गॅसनजीक ही घटना घडली. या प्रकरणी राजाराम रामेश्वरलाल महेश्वरी (वय ६८, रा. लक्ष्मी प्रोसेसर्सजवळ) यांनी शिवाजीनगर पोलिसांत तक्रार दिली आहे.