औषधोपचारासाठीचे सापडलेले 14 हजार रूपये केले परत
प्रतिनिधी / कोल्हापूर
सीपीआर हॉस्पिटलमधील एका कर्मचाऱयांना ड्युटीवर येत असताना महत्वाची कागदपत्रे असलेली बॅग सापडली. त्यात वैद्यकीय रिपोर्टसह रोख 14 हजार रूपये होते. या कर्मचाऱयाने संबंधितांना शोधून सीपीआरमध्ये ही बॅग प्रामाणिकपणे परत केल्याची घटना शुक्रवारी घडली.
कोल्हापुरातील इंद्रजित फराकटे यांचे शुक्रवारी शिवाजी पेठ ते जुना वाशी नाका मार्गावर प्रवास करताना बॅग हरवली. त्यामध्ये त्यांची महत्त्वाची कागदपत्रे व बहीणीच्या औषधोपचारासाठी ठेवलेले १४ हजार रूपये होते. ही बॅग सीपीआर हॉस्पिटलमधील कर्मचारी किरण सराटे यांना सापडली. बॅगमधील कागदपत्रावरून किरण सराटे यांनी फराकटे यांच्याशी संपर्क साधला आणि प्रामाणिकपणे ही बॅग त्यांना परत केली.