प्रतिनिधी /बेळगाव
स्मार्ट सिटीअंतर्गत मध्यवर्ती आणि सीबीटी बसस्थानकाचा विकास साधला जात आहे. कोरोनामुळे मागील काही दिवसांपासून संथगतीने सुरू असलेल्या कामाला गती मिळाली आहे. शुक्रवारी सीबीटी बसस्थानकाच्या दुसऱया मजल्याची स्लॅबभरणी करण्यात आली.
मध्यवर्ती बसस्थानक आणि सीबीटी बसस्थानकाची तब्बल 31 कोटी रुपयांच्या निधीतून उभारणी केली जात आहे. मागील पाच वर्षांपासून हे काम सुरू आहे. मात्र कोरोना आणि इतर कारणांमुळे हे काम लांबणीवर पडले आहे. आता मात्र सीबीटी बसस्थानकाचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले आहे. तळमजला आणि पहिल्या मजल्याचे काम संपवून दुसऱया मजल्याच्या कामाला सुरुवात झाली आहे.
प्रवाशांच्या सोयीसाठी सुसज्ज बसस्थानक उभारले जात आहे. शिवाय बसस्थानकात प्रवाशांच्या वाहनांसाठी सुसज्ज पार्किंग व्यवस्था केली जात आहे. सध्या दुसऱया मजल्याचे काम प्रगतीपथावर आहे. पाच वर्षांपूर्वी या कामाला सुरुवात झाली होती. मात्र लॉकडाऊनमुळे मध्यंतरी काम बंद राहिले. या रखडलेल्या कामाला जोमात सुरुवात झाली आहे.
सीबीटी बसस्थानकात वाहने घेऊन येणाऱया प्रवाशांसाठी पार्किंगची व्यवस्था केली जात आहे. या ठिकाणी एकावेळी हजारो वाहने पार्क करण्याची क्षमता आहे. त्यामुळे प्रवाशांची सोय होणार आहे. शिवाय परिसरातील पादचारी व प्रवाशांची गर्दी कमी करण्यासाठी भुयारी मार्ग उभारला जात आहे.