सुमारे ३ लाख ५८ हजाराचा साठा जप्त
प्रतिनिधी / शिरोळ
सुगंधी तंबाखूचा साठा केल्याप्रकरणी शिरोळचे उपनगराध्यक्ष राजेंद्र माने (रा. शिरोळ) याच्यावर शिरोळ पोलिसांनी कारवाई करुन ३ लाख ५८ हजार ५०० रुपयाचा साठा जप्त करण्यात आला असून त्यास ताब्यात घेतले आहे.
याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी की बेघर वसाहतमागील जयहिंदनगर येथे माने याने घरात सुगंधी तंबाखूजन्य पदार्थांचा साठा केला असल्याची माहिती आज दुपारी खात्रीशीर खबऱ्याकडून मिळाली सोमवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवानंद कुंभार यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसमवेत छापा टाकला.
यावेळी छाप्यातील सुगंधी तंबाखूचा साठा मिळुन आला यामध्ये विविध कंपन्याचे सुगंधी तंबाखू जप्त करण्यात आला तीन लाख 58 हजार रुपये. किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवानंद कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली ज्ञानेश्वर सानप, ताहिर मुल्ला, गजानन कोष्टी, हनुमंत माळी, प्रियांका कदम यांच्या पथकाने ही कारवाई केली.अधिक तपास पोलिस निरीक्षक शिवानंद कुंभार हे करीत आहेत.