निवडणुकीच्या पाटर्य़ांचा ठरतोयत मळणीमध्ये बेत : इच्छुंकांची घाईगडबड वाढली, शिवरात रंगतेय ग्रा.पं.ची चर्चा
प्रतिनिधी / बेळगाव
निवडणूक आयोगाने डिसेंबर अखेरपर्यंत निवडणुका होतील अशी सुचिन्हे दिली आहेत. या निवडणुका दोन टप्प्यात पार पाडण्याचे संकेत निवडणूक आयोगाने दिले आहेत. त्यामुळे इच्छुकांची धावपळ वाढली आहे. मात्र सुगी हंगामात निवडणुकांची धांदल उडत असल्याचे चित्र दिसून येत आहे. मळणीतच अनेक इच्छुक ओल्या पाटर्य़ां देवून अनेकांकडून आश्वासने घेतानाच्या चर्चा रंगत आहे. एकीकडे इच्छुकांची घाईगडबड वाढली असताना शिवारात निवडणुकींच्या चर्चेला उधाण आले आहे. मळण्यांच्या खळय़ात ग्रा.पं. निवडणुकांचाच बोलबाला सुरू असल्याचे स्पष्ट होत आहे.
निवडणुकांसाठी तीन आठवडय़ाचे वेळापत्रक जाहीर करण्याची सूचना आयोगाने केली आहे. कोरोना महामारीमुळे निवडणुका लांबणीवर पडल्या आहेत. मेमध्ये होणाऱया निवडणुका आता डिसेंबर अखेरपर्यंत जावून पोहोचल्या आहेत. आता निवडणूक आयोगाने हालचाली गतिमान केल्याने पुन्हा एकदा इच्छुकांच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. तालुक्मयातील अनेक माजी ग्राम पंचायत सदस्य व नव्याने इच्छुक उमेदवार आतापासूनच मतदारांच्या गोठीभेटी घेण्यावर भर देतानाचे चित्र दिसून येत आहेत.
माजी सदस्यांनी आपल्या कामांच्या विकासाचा पाढा समर्थकांकडून वाचविण्यास सुरूवात केली आहे. मात्र नवीन उमेदवार त्यांच्या भकासाचे गीत गात आहेत. त्यामुळे अनेकांमध्ये चढाओढ निर्माण होत आहे. सुगीतही अनेक जण आपल्या उमेदवारांचे गुणगाण गात आहेत. त्यामुळे मळणीच्या खळय़ात प्रत्येक इच्छुकाच्या बाजूने असणाऱयांनी आपापला उमदेवार अशा प्रकारे चांगला आहे हे दाखविण्यासाठी चढाओढ करत आहेत.
इच्छुक उमेदवार-माजी सदस्यांत जोरदार खडाजंगी
सध्या राज्य निवडणूक आयोगाने सर्व जिल्हाधिकाऱयांना निवडणूक दोन टप्प्यात घेण्याचे पत्र पाठवून दिले आहे. त्यानुसार राज्यात ग्राम पंचायत निवडणुकांचे लवकरच बिगुल वाजणार आहे. त्या दृष्टिकोनातून कोणत्या जिह्यात कोणत्या टप्प्यात निवडणुका होणार याची माहिती मागविण्यात येत आहे. मात्र आतापासूनच इच्छुकांनी गुडघ्याला बाशिंग बांधून ओल्या पाटर्य़ांचा बेत मळणीत साजरा करण्याचे चित्र तालुक्मयात रंगत आहेत. बेळगाव परिसरातील अनेक ग्राम पंचायतींमध्ये मोठय़ा प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे. यामध्ये कोणत्या सदस्यांनी किती पैसे खाल्लेत किंवा नागरिकांकडून किती पैसे उकळलेत याची सर्व चर्चा सध्या मळणीच्या ठिकाणी रंगत आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवार आणि माजी सदस्यांत यावेळी खडाजंगी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
प्रत्येकाचे आपापल्या परीने प्रयत्न
मागीलवेळी निवडून आलेले उमेदवाराला काहींनी गावांतून विरोधही करण्यास सुरूवात झाली आहे तर काहींनी प्रामाणिक काम केल्यामुळे त्यांनाच उमेदवारी देण्यासंदर्भातही चर्चा रंगत आहे. मात्र या साऱया चर्चा मळणीच्या खळय़ात रंगतानाचे चित्र दिसून येत आहेत. यावेळी मात्र प्रत्येक जण आपापल्या परीने प्रयत्न करत आहेत. यावेळी मतदार कमी आणि उमेदवार जास्त असेच चित्र निर्माण होण्याची शक्मयता आहे. मात्र काही सदस्यांनी भ्रष्टाचार, उद्योग खात्री योजनेतील कामांमध्ये गैरप्रकार केल्यामुळे त्यांचे पद संपुष्टात येण्याची शक्मयताही नाकारता येत नाही.