अत्याधुनिक सुविधांसह डिजिटल कनेक्टसोबत डिस्प्ले
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
सुझुकी मोटारसायकलने नव्या स्कूटर एवेनिसचे (Suzuki Avenis ) सादरीकरण केले आहे. विशेष म्हणजे स्कूटरमध्ये डिजिटल डिस्प्लेसह सुझुकी राइड कनेक्ट ऍप्लिकेशनच्या मदतीने मोबाईलवर जोडून गाडी संदर्भातील फिचर्स हाताळण्याची सुविधा मिळणार आहे. यामध्ये एसएमएस आणि व्हॉटसऍप, मिस्ड कॉल, अलर्ट स्कूटर डिस्प्लेवर उपलब्ध होणार असल्याची माहिती आहे.
सुझुकी एवेनिसची विक्री डिसेंबरपासून सुरु होणार असल्याची माहिती कंपनीने दिली आहे. ब्रँड न्यू स्कूटर संपूर्ण भारतामध्ये स्पर्धेकरीता गाडी सादर करणार आहे. मेटालिक टायटन ब्लू कलरसह पाच नवीन रंगात गाडी घेण्याचा पर्याय उपलब्ध होणार आहे.
नव्या सुझुकी एवेनिस स्कूटरची सुरुवातीची एक्स शोरुम किमत 86,700 रुपये आहे. यामध्ये कलर ऑप्शनसोबत स्कूटरची एक्स शोरुम किमत निश्चित होणार असल्याची माहिती आहे.