घरफाळा सवलत योजनेसाठी महापालिकेचा निर्णय : घरफाळयावरील दंडव्याजाच्या सवलतीचा लाभ घेण्याचे आवाहन
प्रतिनिधी/कोल्हापूर
घरफाळा दंड व्याजावरील सवलतीसाठी महापालिकेची नागरी सुविधा केंद्रे जानेवारीमध्ये सुट्टीच्या दिवशीही कार्यालयीन वेळेत सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत सुरु ठेवण्यात येणार आहे. नागरीकांना घरबसल्याआपली थकीत रक्कम भरण्यासाठी Online Payme रक्कम भरण्याचीही सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. तसेच सुविधा केंद्रामध्ये गर्दी होऊ नये यासाठी या सर्व ठिकाणी मिळून पैसे भरण्यासाठी 40 काऊंटर उपलब्ध करुन देण्यात आले आहेत.
महापालिकेने 1 हजार स्क्वेअर फुटाच्या आतील निवासी मिळकत धारकांना दंडच्या व्याजामध्ये 26 जानेवारी ते 31 जानेवारी पर्यंत एकरकमी संपूर्ण कराची रक्कम भरल्यास दंड व्याजात 70 टक्के, 1 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारी पर्यंत एकरकमी संपूर्ण कराची रक्कम भरल्यास दंड व्याजात 60 टक्के व 1 मार्च ते 31 मार्च पर्यंत एकरकमी संपूर्ण कराची रक्कम भरल्यास दंड व्याजात 50 टक्के सवलत जाहीर केली आहे.
1 हजार स्क्वेअर फूटाच्या वरील निवासी मिळकतधारकांना दंडच्या व्याजामध्ये 26 जानेवारी ते 31 जानेवारी 2021 पर्यंत एकरकमी संपूर्ण कराची रक्कम भरल्यास दंड व्याजात 50 टक्के, 1 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारी 2021 पर्यंत एकरकमी संपूर्ण कराची रक्कम भरल्यास दंड व्याजात 40 टक्के व 1 मार्च ते 31 मार्च 2021 पर्यंत एकरकमी संपूर्ण कराची रक्कम भरल्यास दंड व्याजात 30 टक्के सवलत दिली जाणार आहे.
घरफाळा भरण्यासाठी नागरी सुविधा केंद्रे अशी
नागरी सुविधा केंद्र क्र.1, गांधी मैदान, नागरी सुविधा केंद्र क्र.2, शिवाजी मार्केट, नागरी सुविधा केंद्र क्र.3, राजारामपूरी, बागल मार्केट, नागरी सुविधा केंद्र क्र.4, ताराराणी मार्केट, कावळा नाका, नागरी सुविधा केंद्र, मुख्य इमारत, पाणीबिल वसुली केंद्र, कसबा बावडा व Online Payment करणेसाठी www.kolhapurcorporation.gov.in या वेबसाईटवर Online रक्कम भरुन घेण्यात येईल. तसेच ऑनलाइन प्रणालीद्वारे संकेतस्थळावरून कर भरणा करताना सवलतीची रक्कम ऑनलाइनद्वारे स्वतः वजा करू नये. सिस्टीमद्वारे सवलतीची रक्कम आपोआप वजा होते, याची नोंद घ्यावी. सदर घरफाळा योजनेचा लाभ फक्त निवासी मिळकतीकरिता असून अन्य सर्व मिळकतीना सवलत योजनेचा लाभ 1 फेब्रुवारी 2021 नंतर मिळणार आहे. तरी या सवलत योजनेचा लाभ जास्तीत जास्त नागरीकांनी घ्यावा असे आवाहन प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांनी केले आहे.