वृत्तसंस्था /मुंबई
भारतातील आघाडीवरील व्यावसायिक वाहन उत्पादकांपैकी एक, तसेच तीनचाकी वाहनांपासून ते 55 टन क्षमतेच्या एचसीव्ही ट्रक्सपर्यंतच्या उत्पादनांची विस्तृत श्रेणी असलेली कंपनी, महिंद्रा अँड महिंद्रा लि.ने ‘सुप्रोप्रॉफिट ट्रक’ ची श्रेणी नुकतीच सादर केली आहे.
स्वतंत्र प्रमाणपत्रावर आधारावर हे सिद्ध झाले आहे की ‘सुप्रोप्रॉफिट ट्रक’ची इंधन कार्यक्षमता व पेलोडची क्षमता उच्च पातळीवरील असल्याने ग्राहकांना 26 ते 36 टक्के अधिक नफा मिळण्याची संधी आहे. या अत्यंत आकर्षक उत्पादनाची श्रेणी व ऑफर यासाठी ‘महिंद्रा’ने ‘ब्रँड
ऍम्बेसेडर’ म्हणून अभिनेते व निर्माते अजय देवगण यांना नेमले आहे. ‘महिंद्रा अँड महिंद्रा लि.’च्या ऑटोमोटिव्ह विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी वीजय नाक्रा म्हणाले, “ग्राहकांची समृद्धी हाच आमच्या व्यवसायातील या पोर्टफोलिओसाठीचा मंत्र आहे. ग्राहकांना एकतर आम्ही नफा मिळवून देऊ किंवा हा सुप्रोप्रॉफिट ट्रक परत घेऊ, हा आमचा सुप्रोसाठीचा प्रस्ताव आहे. सुप्रोमुळे अधिक मायलेज आणि मालवाहतूकीची अधिक क्षमता यांची जी हमी मिळते, यातून तो निर्माण झालेला आहे.
नवीन ‘सुप्रोप्रॉफिट ट्रक मिनी’ हे 2 टनांपेक्षा कमी क्षमतेच्या प्रकारातील शक्तीशाली वाहन आहे, तर ‘सुप्रोप्रॉफिट ट्रक मॅक्सी’ हे वाहन 2 ते 3.5 टन या क्षमतेच्या स्पर्धेत उतरण्यास सज्ज आहे.