प्रतिनिधी/ बेळगाव
स्वराज्याची राजधानी असणाऱया रायगडाला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी भिडे गुरुजींच्या प्रेरणेतून 32 मण सुवर्ण सिंहासनाचा संकल्प शिव प्रतिष्ठानने केला आहे. या सुवर्ण सिंहासनासाठी शिवभक्तांमधून कर्तव्य निधी जमा केला जात आहे. शिवप्रति÷ान बेळगाव शाखेच्या वतीने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत बेळगावमधुन शिवभक्तांकडून कर्तव्य निधीचा ओघ सुरू आहे.
दुर्गामाता दौडवेळी सुवर्ण सिंहासनाविषयी जागृती केली जात आहे. बेळगावचे उद्योजक शिरीष गोगटे यांच्याकडून सुवर्ण सिंहासनासाठी भरीव असा कर्तव्य निधी शिवप्रति÷ानकडे देण्यात आला आहे. याचबरोबर लोकमान्य सोसायटीचे उपाध्यक्ष डॉ. दामोदर वागळे यांच्याकडून 5 हजारचा धनादेश सुवर्ण सिंहासनासाठी देण्यात आला. यावेळी शिव प्रतिष्ठानचे जिल्हाध्यक्ष किरण गावडे, विभाग प्रमुख किरण बडवाण्णाचे, शहर कार्यवाहक विश्वनाथ पाटील, दीपक पवार यासह इतर उपस्थित होते.