नवी दिल्ली
ग्राहकोपयोगी उत्पादनांच्या क्षेत्रात नाव कमावलेल्या सॅमसंगने आपला नवा विंड फ्री एसी नुकताच बाजारात दाखल केला आहे. देशातील पहिलावहिला हा विंडफ्री एसी असेल जो पीएम 1.0 फिल्ट्रेशनची क्षमता बाळगू शकेल. हा एसी खोलीत 0.3 मायक्रॉनपर्यंतचे धुळीचे घटक दूर करेल आणि खोलीतील व्हायरस, बॅक्टेरियांनाही इलेक्ट्रोस्टेटीक चार्जरच्या सहाय्याने संपवून टाकेल, असा दावा कंपनीने केला आहे. घरात किंवा ऑफिसात वापरल्यास शुद्ध आणि ताजी हवा पुरवण्याचे कार्य हा एसी करेल, असेही कंपनीने म्हटले आहे. हे एसी 1 वे कॅसेट, 4 वे कॅसेट आणि 360 कॅसेट या तीन प्रकारात उपलब्ध होणार असून सुरूवातीची किंमत 90 हजारपासून (जीएसटी अतिरीक्त) सुरू होणार आहे. ग्राहकांना ऑफलाइन आणि ऑनलाइन माध्यमातून एसी खरेदी करता येणार आहे.