ऑक्टोबरमधील आकडेवारी सादर : उत्पादन विक्रीत तेजी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
सणासुदीच्या दिवसांमध्ये सॅमसंगचा व्यवसाय वेगाने वाढत आहे. ऑक्टोबर महिन्यात सॅमसंगची कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक व्यवसायामध्ये 32 टक्क्मयांची वाढ झाल्याची माहिती आहे. याच दरम्यान कंपनीच्या प्रीमियम इलेक्ट्रॉनिक्स वर्गात ही वाढ 50 टक्क्यांपर्यंत राहिली आहे. सदरची कामगिरी करण्यास सणासुदीच्या दिवसांचा मोठा लाभ झाल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.
सॅमसंग इंडियाने यावेळी दिलेल्या माहितीनुसार भारतात विक्रीने ऑगस्ट आणि सप्टेंबर या महिन्यात 20 टक्क्मयांची तेजी नोंदवली आहे. कोविडच्या कारणामुळे विविध नियमावलीत कंपनीचा व्यवसाय अडकून पडला होता. परंतु अनलॉकनंतर यात मोठय़ा प्रमाणात सवलती दिल्या गेल्याने व्यवसाय अधिक सुलभ झाला.
ऑक्टोबर महिना लाभाचा
चालू वर्षात कंपनीसाठी ऑक्टोबर महिना महत्त्वाची भूमिका निभावणारा ठरला आहे. यामध्ये टायर 2 आणि टायर 3 शहरातील ग्राहकांच्या मागणीने तेजी पकडली असल्याचे सॅमसंग इंडिया कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक व्यवसायाचे वरीष्ठ उपाध्यक्ष राजु पुल्लन यांनी सांगितले आहे.
फ्रीज विक्रीत तेजी
लहान शहरात फ्रॉस्ट फ्री फ्रीज सेगमेंटमध्ये 70 टक्क्मयांची वाढ तसेच साइड बाय साइड फ्रीजमध्ये 100 टक्क्यांची समाधानकारक वाढ नोंदवण्यात आली आहे.