108 एमपीचा कॅमेरा : 512 जीबी स्टोरेजसह अन्य सुविधा
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
सॅमसंग कंपनीने आपला नवा गॅलक्सी एस 22 हा स्मार्टफोन सादर केला आहे. या आवृत्तीत तीन स्मार्टफोन असून गॅलक्सी एस 22, एस 22 प्लस व एस 22 अल्ट्रा या मॉडेलचा समावेश आहे. सदरचे तीन फोन गॅलक्सी अनपॅक्टड 2022 व्हर्च्युअल कार्यक्रमात सादरीकरण करण्यात आले. गॅलक्सी एस 22 मधील सर्व स्मार्टफोन्सना क्वालकॉम स्नॅपड्रगन 8 जनरेशन 1 प्रोसेसर आहे.
फिचर्स ः
w अँड्रॉईड 12 बेस्ड वन युआय 4.1 ऑपरेटिंग सिस्टम
w 6.1 इंच पूर्ण एचडी डायनामिक एमोलेड डिस्प्ले दिला आहे.
w रिप्रेश रेट 48 एचझेड ते 120 एचझेडपर्यंत आहे.
w 8 जीबी रॅम व 256 जीबी स्टोरेजच्या गॅलक्सी एस 22 ची किमत 72,999 पासून सुरु होते.
w 8 जीबी व 128जीबी स्टोरेजसह येणाऱया गॅलेक्सी एस 22 प्लसची किमत 84,999 रुपयापासून सुरु होते.
w गॅलक्सी एस 22 अल्ट्रा मॉडेलची किमत (12 जीबी रॅम व 256 जीबी स्टोरेज) 1,09,999 रुपये आहे.